सांग सखे सांग ना
सांग सखे सांग ना, मी तुझाच ना?
सांग सख्या सांग ना, मी तुझीच ना?
धुंदधुंद गारवा तू मला हवा
अंगअंग मोहरले स्पर्श हा नवा
प्रीतिची साक्ष पटे आज मन्मना
निळेनिळे नयन तुझे भुलविती मला
गोरागोरा रंग तुझा सुखवितो मला
नांदू सुखे संगती आस ही मना
सांग सख्या सांग ना, मी तुझीच ना?
धुंदधुंद गारवा तू मला हवा
अंगअंग मोहरले स्पर्श हा नवा
प्रीतिची साक्ष पटे आज मन्मना
निळेनिळे नयन तुझे भुलविती मला
गोरागोरा रंग तुझा सुखवितो मला
नांदू सुखे संगती आस ही मना
गीत | - | हिरालाल कलगूटकर |
संगीत | - | अविनाश व्यास |
स्वर | - | आशा भोसले, मन्ना डे |
चित्रपट | - | नंदादीप |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |