सांग सख्या तुज काय
मी तीच परंतु ती नव्हे
सांग सख्या, तुज काय हवे?
जे आत वसे ते वरी हवे
बाहेर मिळे ते घरी हवे
घे मला दिले मी रूप नवे
ठसक्यात ठाकले तुझ्यापुढे
करी अत्तरदाणी पान विडे
मी पुसट बोलते, जुळव दुवे
गाईन गझल मी दर्दभरी
येऊन जवळी तू हात धरी
बघु देत आरसे आणि दिवे
सांग सख्या, तुज काय हवे?
जे आत वसे ते वरी हवे
बाहेर मिळे ते घरी हवे
घे मला दिले मी रूप नवे
ठसक्यात ठाकले तुझ्यापुढे
करी अत्तरदाणी पान विडे
मी पुसट बोलते, जुळव दुवे
गाईन गझल मी दर्दभरी
येऊन जवळी तू हात धरी
बघु देत आरसे आणि दिवे
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | नूतन |
चित्रपट | - | पारध |
गीत प्रकार | - | चित्रगीत |