सांगू कशी प्रिया मी
सांगू कशी प्रिया मी माझे मला कळेना
हळुवार भावना ही शब्दांस आकळेना
एकान्त आगळा हा, ही वेगळीच रात
चाहूल काय बाई बाहेर की मनात
संकोच लाजरीचा अजुनी कसा ढळेना
लज्जा अबोल झाली डोळेच बोलु दे रे
अपुरा अधीर श्वास हृदयास तोलु दे रे
उकलून पाकळी ये परि फूल हे फुलेना
नवखा तुझ्यापरी मी, नवखी मनात धुंदी
माझ्यातुझ्या सभोवती भरले धुके सुगंधी
मधुरात मीलनाची फिरुनी अशी मिळेना
हळुवार भावना ही शब्दांस आकळेना
एकान्त आगळा हा, ही वेगळीच रात
चाहूल काय बाई बाहेर की मनात
संकोच लाजरीचा अजुनी कसा ढळेना
लज्जा अबोल झाली डोळेच बोलु दे रे
अपुरा अधीर श्वास हृदयास तोलु दे रे
उकलून पाकळी ये परि फूल हे फुलेना
नवखा तुझ्यापरी मी, नवखी मनात धुंदी
माझ्यातुझ्या सभोवती भरले धुके सुगंधी
मधुरात मीलनाची फिरुनी अशी मिळेना
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर |
चित्रपट | - | सतीची पुण्याई |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
आकळणे | - | आकलन होणे, समजणे. |
आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |