A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सांज झाली तरी माथ्यावरी

सांज झाली तरी, माथ्यावरी उन्हाचे भरते !
अशी एकाकी मी, माझी मला माझी न मी उरते !

घाई जगण्याची, अशी दाटली गर्दी भवती
आणि रस्‍त्‍यात भर उन्हात, तुझा हात सुटला
थकले मी धावुनी, सावलीचा पाठलाग करते
सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते !

धागे तुटले जरी स्वप्‍ने तुझी विणता विणता
ती वीण आजही छातीतली निरगाठ आहे
ही नजर आजही तू नेलेल्या दिवसात भिडते
सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते !