A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
संसाराच्या सारिपटाचा कसा

संसाराच्या सारिपटाचा कसा उधळला डाव
न कळे कोठुन आले वादळ, उलटी झाली नाव

अंगणातली वेल चिमुकली
होती नुकती फुलू लागली
निराधार होऊन कोसळे, तरुवर पडता घाव

वेलीवरले फूल सानुले
धुळीत मिळुनी पहा चुरगळे
फुलावरी का देवा व्हावा, आगीचा वर्षाव?

जळुनी गेली सुंदर स्वप्‍ने
उजाड झाले घरकुल चिमणे
सौभाग्याचा गाव वाहिला, केवळ उरले नाव
गीत - पु. ल. देशपांडे
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर- आशा भोसले
चित्रपट - देवबाप्पा
गीत प्रकार - चित्रगीत
सान - लहान.