A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सारे प्रवासी घडीचे

सारे प्रवासी घडीचे,
नांदू सुखे संगती.

या दुनियेच्या अफाट हाटी
पडती गाठी-भेटी अवचित
पडती गाठी-भेटी
बोलू संगे, चालू संगे
खेळू नाचू हसू रुसू संगे.

पाहू संगे सुख-सोहाळे
साहू संगे वीजा-वादळे
जीव संगे, भाव संगे
प्राण देऊ संगती.

प्रीति-मैत्रीच्या पावन तीर्थी
न्हाऊ, देऊ जीवा सुख-शांती
गीत - शांताराम आठवले
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- वसंत देसाई, जयश्री
चित्रपट - शेजारी
ताल-केरवा
गीत प्रकार - चित्रगीत
हाट - बाजार.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.