सर्वस्व तुजला वाहुनी
सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरीं मी पाहुणी,
सांगू कसें सारें तुला, सांगूं कसें रे याहुनी.
घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया?
अंधार होतो बोलका वेड्यापिशा स्वप्नांतुनी.
माझ्या सभोंतीं घालतें माझ्या जगाची भिंत मी;
ठरते परि ती कांच रे दिसतोस मजला त्यांतुनी
संसार मी करितें मुका दाबून माझा हुंदका;
दररोज मी जातें सती, आज्ञा तुझी ती मानुनी.
वहिवाटलेली वाट ही मी काटतें दररोज रे
अन् प्राक्तनावर रेलतें, छाती तुझी ती मानुनी.

गीत | - | विंदा करंदीकर |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | पद्मजा फेणाणी-जोगळेकर |
अल्बम | - | ही शुभ्र फुलांची ज्वाला |
गीत प्रकार | - | कविता |
टीप - • काव्य रचना - १९६५. |