सासर सोडून माहेरी मी
सासर सोडून माहेरी मी जरी येत असे कधी गडे
लक्ष सारखे तिकडे बाई, मला मुळी ना चैन पडे
सासू माझि जगावेगळी, जगावेगळा राग तिला
'आजकालच्या अशाच पोरी' सदा टोचुनी म्हणे मला
तिची आठवण होता माझं काळिज धडधड पहा उडे
लक्ष सारखे तिकडे बाई मला मुळी ना चैन पडे
मामंजीचा स्वभाव न्यारा, म्हणती "शिस्तीत बोला-चाला"
पदर डोईचा डळू न देती म्हणती "फॅशन नको मला"
लक्ष सारखे अमुच्यावरती कोटच माडीवरती खडे

नटीसारखी नणंद नटते, खुशालचेंडु दीर असे
त्यात तिकडची स्वारी नेहमी पाहून माझ्याकडे हसे
परि मनाचे मोठे मजवर त्या सर्वांचा जीव जडे

गीत | - | अनिल भारती |
संगीत | - | मधुकर पाठक |
स्वर | - | सुलोचना चव्हाण |
गीत प्रकार | - | भावगीत |
कोट | - | तट, मजबूत भिंत. |