A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सावज माझं गवसलं

सावज माझं गवसलं
सावज माझं गवसलं ॥

अरे अरे सावजा विसरू नको
उगाच गमजा करू नको
तीर सरासर माझा सुटता
कुणीच नाही रं बचावलं ॥

गौरीच्या ग शंकरानं
गिरिजेच्या गिरीशानं
दुर्गेच्या ग दुर्गेशानं
माझ्यावरी कृपा केली ॥

लखलख लखलख माझा बाण
करील तुझी रे दाणादाण
मदनधनूच्या बाणालाही
जयानं चटकन हरवलं ॥

अशी तशी मी नसे कुणी
मी वनराणी रूपखनी
रस राजाने नवीन यौवन
तनमन माझं सजवलं ॥
खनि - खाण.