शब्द शब्द जुळवुनी वाचिते
शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना
आवरू किती गडे, धीर नाही लोचना
अजाणतेपणी कुणी मला कुणास वाहिले
असेल देव तो तरी मी न त्यास पाहिले
आंधळी कळी खुळी मजसी काय कल्पना
उघडताच पाकळी लाभली तुझी दिठी
तुजसी देव मानुनी घातली गडे मिठी
नीतिपाठ ओरडे, हीच पापवासना
आवरू किती गडे, धीर नाही लोचना
अजाणतेपणी कुणी मला कुणास वाहिले
असेल देव तो तरी मी न त्यास पाहिले
आंधळी कळी खुळी मजसी काय कल्पना
उघडताच पाकळी लाभली तुझी दिठी
तुजसी देव मानुनी घातली गडे मिठी
नीतिपाठ ओरडे, हीच पापवासना
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | सुखाची सावली |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
दिठी | - | दृष्टी. |