शशिकुलभूषण सदया
          "शशिकुलभूषण सदया । मत्प्राणेश्वर विजया ।
विनवी ही तव जाया । मान्य कराया ॥
अर्पियली ही काया । तव चरणीं पतिराया ।
ठाउक असुनी हें सखया । त्यजली कां माया ॥
मज दुर्योधनाहातीं । द्याया निश्चय करिती ।
बंधू ते नायकिती । बघतां अंत किती ॥
समयीं नाहीं आलां । देइन मी प्राणाला ।
धाडियलीसे मला । खूण तुम्हांला ॥"
"रिपु नेतां भार्येसी । सुचली यात्रा कैसी ।
याहुनि होउनि संन्यासी । न्या मज सेवेसी ।"
          विनवी ही तव जाया । मान्य कराया ॥
अर्पियली ही काया । तव चरणीं पतिराया ।
ठाउक असुनी हें सखया । त्यजली कां माया ॥
मज दुर्योधनाहातीं । द्याया निश्चय करिती ।
बंधू ते नायकिती । बघतां अंत किती ॥
समयीं नाहीं आलां । देइन मी प्राणाला ।
धाडियलीसे मला । खूण तुम्हांला ॥"
"रिपु नेतां भार्येसी । सुचली यात्रा कैसी ।
याहुनि होउनि संन्यासी । न्या मज सेवेसी ।"
| गीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर | 
| संगीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर | 
| स्वर | - | |
| नाटक | - | सौभद्र | 
| गीत प्रकार | - | नाट्यसंगीत | 
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.  | 
| जाया | - | पत्नी. | 
| भार्या | - | पत्नी. | 
| रिपु | - | शत्रु. | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
  
  
  
  
  
  
  
  
  
  










