शेजारच्या घरात आलास
शेजारच्या घरात आलास पाहुणा तू
माझ्या घराकडे रे तव दृष्टी का परंतु?
जात्यावरी पहाटे मी बोलताच गीत
घेउनी करी पावा करितोस गोड साथ
मी घाली सडा तेव्हा ओटीवरी तू येसी
उडताच पदर माझा टक लावुनी पहासी
जाता धुण्या नदीला करितोस पाठलाग
आंघोळीच्या मिषाने मम भिजवितोस अंग
दिसलास आज नाही, गेलास काय न कळे
बघण्यास आज कैसे मिळतील गोड चाळे?
आहे मला भरोसा, घेशील पुन्हा धाव
अन् प्रेमरज्जुंनी हे एकत्र गुंफू जीव
माझ्या घराकडे रे तव दृष्टी का परंतु?
जात्यावरी पहाटे मी बोलताच गीत
घेउनी करी पावा करितोस गोड साथ
मी घाली सडा तेव्हा ओटीवरी तू येसी
उडताच पदर माझा टक लावुनी पहासी
जाता धुण्या नदीला करितोस पाठलाग
आंघोळीच्या मिषाने मम भिजवितोस अंग
दिसलास आज नाही, गेलास काय न कळे
बघण्यास आज कैसे मिळतील गोड चाळे?
आहे मला भरोसा, घेशील पुन्हा धाव
अन् प्रेमरज्जुंनी हे एकत्र गुंफू जीव
गीत | - | |
संगीत | - | |
स्वर | - | गोविंद कुरवाळीकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.