A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
श्रमिक हो घ्या इथे

मानवतेचे मंदिर माझे, आत लाविल्या ज्ञानज्योती
श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती!

बंधुत्वाची येथ सावली, अनाथ अमुचे मायमाउली
कधी दिसे का ईश राउळी? देव ते अंतरात नांदती!

आम्ही लाडके विठुरायाचे, लेणे जरिही दारिद्र्याचे
अभंग ओठी मानवतेचे, मृदुंगी वेदनेस विस्मृती!

दार घराचे सदैव उघडे, भागवताची ध्वजा फडफडे
भावभक्तीचे अम्हां साकडे, पथिक हे परंपरा सांगती!
गीत- रवींद्र भट
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट- ते माझे घर
गीत प्रकार - चित्रगीत
राऊळ - देऊळ.
लेणे - वस्‍त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम.
साकडे - संकट / कोडे.