A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शुक शुक मन्या

शुक शुक मन्या, जातोस की नाही, का पाठीत घालू लाटणं?
नको ग मने, तुला न शोभे, तुझ्या मन्याला असं हे हाकलून देणं !

निवांत आहे अवतीभवती तू संधी शोधली नामी
तुझ्या प्रीतीच्या लोण्यासाठी चोरून आलो ना मी !
बसेल बडगा पाठीत मिस्टर, भंगून जाईल स्वप्‍न
आता घालू का पाठीत लाटणं?

बिलगाया मी तुजला येता उडवुनि का लाविसी?
किती लोचटा, मागे मागे करुनी घोटाळसी?
बरं नव्हे हं, मने प्रियतमे, फिस्कारून बोलणं
आता घालू का पाठीत लाटणं?

भेटीगाठीला सोकावून तू फारच गेलास मन्या
काय करू मी, चैन पडेना, मुळिच मला तुजविना
मनात प्रीती तुझ्या खरं ना, वरवर रागावणं?
शुक शुक !!