सिंहगडचा पोवाडा
किल्ल्यात किल्ला अवघड । भयंकर चढ । असा सिंहगड ।
प्राणाचे मोल देऊन त्याला । तानाजीने सर केला किल्ला । ऐका मर्दाच्या पोवाड्याला ॥
पुण्याजवळ कोंडाणा किल्ला । हल्ली म्हणती सिंहगड त्याला । उदयभानू रजपूत भला । होता किल्लेदार किल्ल्याला । हत्तीचं बळ आहे याला । अशी आवई सर्व मुलखाला । मोंगलाच्या हाती हा किल्ला । तेव्हा हा किल्ला घेण्याला । शिवाजीनं आज्ञा केली तानाजी मालूसर्याला ॥
याचवेळी तानाजी मालूसर्याचे घरी मुलाचा लग्न सोहळा चालू होता. कोंडाणा किल्ला घेण्याची घोर प्रतिज्ञा करून भर मांडवात तानाजीने एकच घोषणा केली. ऐका,
"आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या या रायबाचे."
तानाजी व सूर्याजीचे । हे वचन भावा-भावाचे ॥
आणि मस्तीसाठी लढाऊ मावळा जमा केला. व दोघांनी दोहो बाजुंनी किल्ल्यात प्रवेश करण्याचा चंग बांधून,
किल्ल्याचा भेद घेण्याला । तानाजीने वेष बदलला । दरवेशी कधी जाहला । कधी गोंधळी बनून गेला । अनेक दावून लीला । किल्ल्याचा भेद घेतला । ठरल्या दिवशी मध्यरात्रीला । तानाजी व सूर्याजीनं हल्ला चढविला ॥
हर हर महादेव गर्जना करीत अकस्मात । पहिला पहारा उडवून तानाजी घुसला किल्ल्यात । उदयभानूची उडाली झोप । टाकली झेप तावातावात ॥
आला म्हणती मराठा आला । शत्रूंचा गोंधळ झाला । ओळखेना कोण कोणाला । तरी धावून गेले मराठ्याशी सामना देण्याला ॥
तोच दुसर्या बाजूने सूर्याजी मालुसरे,
लोखंडी दरवाजा फोडून किल्ल्यामध्ये शिरला ॥
तानाजी व सूर्याजी दोघांनी । दोहो बाजुंनी । हल्ला चडवुनी ।
शत्रूचा खर्पूस घेत समाचार । दोघे भाऊ जवळ जवळ येणार । तोवर झाला भलता प्रकार ॥
उदयभानू व तानाजीची । गाठ पडली त्यांची । महायोद्ध्यांची ।
तुंबळ युद्ध सुरू झाले दोघांत । कुणाशी कोणच आटपेनात । दोघेही कुशल प्रवीण युद्धात ॥
इतक्यात तानाजीच्या हातातील ढाल फुटून पडली. ढाल फुटून पडली तरी तानाजी कमरेचा शेला हाताला गुंडाळून त्यावर उदयभानूच्या तलवारीचे वार झेलीतच होता. हे वार झेलता झेलता,
दोघांचा एकमेकांस । वर्मावर खास । घाव लागला । तानाजी पडला ॥
तानाजी पडला तोच,
उदयभानूही झाला ठार । सत्यप्रकार आहे घडलेला । ऐका भाग पुढला ॥
तानाजी पाहून पडलेला । मावळ्यांचा धीर खचला । पळू लागता मावळा आपला । सूर्याजी पुढे धावला । सिंहासारखा पहा गर्जला । तुमचा बाप इथे हा पडला । त्याला टाकून कुठे चालला । शरम धरा बायकांसारखे पळता कशाला । पळून जाऊन तरी सांगणार काय बायकोला ॥
ही नामर्दाची चाल मोडा । तलवारी परजून शत्रूला भिडा ।
फिरा मागे आणि करा शत्रूवरती चाल । मेला तरी देवा दरबारी मान मिळेल ।
जगला तर शिवाजीराजाचं मानकरी व्हाल ॥
जर कोण कच खाऊन । पाहिल मागं वळून । तर त्याला लाथ घालून । उचलून कड्याखालती देईन फेकून ।
मराठ्याची जात सांगता । शिवबाचे सेवक म्हणता । आणि पाय लावून पळता । थूत तुमच्या जिनगानीवर ।
कशासाठी मराठा म्हणून तुम्ही जगता । आणि ही मराठा कुळी मातीमोल करता ॥
म्हणून म्हणतो, "फिरा मागे. बोला हर हर महादेव"
पुन्हा फिरून मावळा चेतला । हल्ला चढविला । शत्रू हटविला ।
किल्ल्यावर भगवा झेंडा चढला । कोंडाणा किल्ला सर केला । गड आला पण सिंह गेला ।
आठवुनी हैदर गुरुजीला । पिराजी गातो पोवाड्याला ॥

गीत | - | शाहीर पिराजीराव सरनाईक |
संगीत | - | शाहीर पिराजीराव सरनाईक |
स्वर | - | शाहीर पिराजीराव सरनाईक |
गीत प्रकार | - | प्रभो शिवाजीराजा, स्फूर्ती गीत |
आवई | - | बातमी. |