A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुख देवासी मागावे

सुख देवासी मागावे
दुःख देवाला सांगावे.

देव मागे, देव पुढे
देव आहे चोहिकडे
डोळे मिटूनी बघावे.

धाव घ्यावी देवापाशी
जशी माउलीच्या कुशी
तान्हियाने प्रेम प्यावे.

देव प्रेमळ प्रेमळ
देव आरसा निर्मळ
बिंब तयात पहावे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  लता मंगेशकर, सुधीर फडके