सुरांनो जाऊ नका रे
मावळतीचे रंग पुसटले भरून आला ऊर
सुरांनो जाऊ नका रे दूर
इथवर संगे आलात माझ्या
आठवणी त्या मनात ताज्या
तुमच्याविण हे जीवन सारे होइल रे बदसूर
संगत माझी करीत आला
दोन पाऊले आणखी चाला
आरतीस या तुम्हीच लावा शेवटचा कापूर
तिन्हीसांज रे झाली आतां
रात कलावी गाणें गातां
जोवर तुम्ही गळ्यांत तोवर राहिल माझा नूर
जिथे वेचले माणिकमोती
तिथेच पुसली अवघी नाती
फिरेल शोधित जग हे माझ्या राखेमधले सूर
सुरांनो जाऊ नका रे दूर
इथवर संगे आलात माझ्या
आठवणी त्या मनात ताज्या
तुमच्याविण हे जीवन सारे होइल रे बदसूर
संगत माझी करीत आला
दोन पाऊले आणखी चाला
आरतीस या तुम्हीच लावा शेवटचा कापूर
तिन्हीसांज रे झाली आतां
रात कलावी गाणें गातां
जोवर तुम्ही गळ्यांत तोवर राहिल माझा नूर
जिथे वेचले माणिकमोती
तिथेच पुसली अवघी नाती
फिरेल शोधित जग हे माझ्या राखेमधले सूर
गीत | - | जयंत भिडे |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |