A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुट्टी एके सुट्टी

सुट्टी एके सुट्टी
सुट्टी दुणे सुट्टी
सुट्टी जर दिली नाही, शाळेला बुट्टी !

भरपूर पाऊस पडू दे,
रस्ते सगळे बुडू दे
सुट्टी जर देत नाही तर सगळ्यांची बुट्टी !

गणिते सगळी मुर्दाबाद,
सुट्टी सुट्टी झिंदाबाद
आई म्हणते घरी रहा, तिच्याशी बट्टी !
गीत - मंगेश पाडगांवकर
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर-
गीत प्रकार - बालगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.