A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वतंत्रते स्वामिनी

स्वतंत्रते स्वामिनी, सुयशदायिनी
महन्‍मंगले कोटी करांचे प्रणाम तव चरणी

आज अलौकिक सुभग सोहळा
घराघरांतुन होत साजरा
जयगीते हा कणकण गातो सप्तस्वर लावुनी

दिशादिशांना बांधा तोरण
ब्रह्मांडाचे सजवा अंगण
फुलाफुलांनो सुगंध शिंपा आली शुभ पर्वणी

गुलाल उधळा द्या आमंत्रण
दिक्‍पालांनो गा यश गायन
लक्ष रवींच्या ज्योती उजळा गगनाच्या अंगणी

माणिकमोती उधळ सागरा
कैलासावर ध्वजा उभारा
शतखंडांनो भारत अमुचा शूरांचा अग्रणी
अग्रणी - नेता, मुख्य.
दिक्‍पाल - दहा दिशांच्या संरक्षक देवता. (इंद्र, अग्‍नी, यम, निर्ऋती, वरुण, वायू, सोम, ईशान, ब्रह्म, अनंत.)
सुभग - दैवी / सुंदर.