A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तळमळतो मी इथे तुझ्याविण

तळमळतो मी इथे तुझ्याविण
शून्य जाहले अवघे जीवन!

गीत उमलले माझ्या ओठी
गाइलेस तू ते मजसाठी
जुळता जुळता रेशीमगाठी
तुटले अवचित कोमल बंधन!

माळ ओघळे फूल ओविता
कवन भंगले शब्द गोविता
स्वप्‍न लोपले बघता बघता
असह्य आता हे जागेपण!

कळे मलाही तुझी वेदना
साद परि मी देउ शकेना
झाले गेले विसर साजणा!
कवन - काव्य.

 

  सुधीर फडके, सुमन कल्याणपूर