A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तांबुस गोरा हात साजिरा

तांबुस गोरा हात साजिरा मुठीत मोती लाख
सजणी, टाक बियाणं टाक!

बंड्या बैलाला हो हो हो हो
माझ्या बैलाला हो..

एका सकाळी फूट कोवळी
काळ्यांत हिरवी झांक!
नाजुक लवलव तशीच वाढव
खुरपून हरळी पाक!
हिरव्या रानी, मंजुळ गाणी गात पाखरे राख!
सजणी टाक बियाणं टाक!

पाखरांची राखण नजरेची गोफण
घरच्या चोराला धाक!
पिकलेल्या मळ्यांत, रास मोज खळ्यांत
ओट्यात पुण्याई टाक!
चांदण्यांत बसून माझ्यासंगं हसून कष्टाची गोडी चाख!
सजणी, टाक बियाणं टाक!
खळे - शेत.
गोफण - शेतातील धान्यावरील पक्षी उडवण्यासाठी दगड मारताना वापरावयाचे उपकरण.
पाक - पक्‍वता.
हरळी - एक प्रकारचे गवत.

 

  आशा भोसले, सुधीर फडके