तें दूध तुझ्या त्या घटांतलें
तें दूध तुझ्या त्या घटांतलें
कां अधिक गोड लागे न कळे.
साईहुनि मउमउ बोटें तीं
झुरुमुरु झुरुमुरु धार काढती,
रुणुझुणु कंकण करिती गीती
का गान मनांतिल त्यांत मिळे?
अंधुक शामल वेळ, टेकडी
झरा, शेत, तरू, मधे झोपडी
त्यांची देवी धारहि काढी
का स्वप्नभूमि बिंबुनि मिसळे?
या दृश्याचा मोह अनावर
पाय ओढुनी आणी सत्वर
जादु येथची पसरे मजवर
का दूध गोडही त्याचमुळे?
कां अधिक गोड लागे न कळे.
साईहुनि मउमउ बोटें तीं
झुरुमुरु झुरुमुरु धार काढती,
रुणुझुणु कंकण करिती गीती
का गान मनांतिल त्यांत मिळे?
अंधुक शामल वेळ, टेकडी
झरा, शेत, तरू, मधे झोपडी
त्यांची देवी धारहि काढी
का स्वप्नभूमि बिंबुनि मिसळे?
या दृश्याचा मोह अनावर
पाय ओढुनी आणी सत्वर
जादु येथची पसरे मजवर
का दूध गोडही त्याचमुळे?
गीत | - | भा. रा. तांबे |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- ३ ऑक्टोबर १९२०, प्रतापगढ. |
बिंबणे | - | ठसणे / उतरणे. |