ठुमकत आल्या किती गौळणी
राधा रमणी मोहन हरिणी, चाले चपल चरणी
ठुमकत आल्या किती गौळणी
आले नेसून काळी चंद्रकळा
सोळा शिणगार आले घालून गळा
घडा लाजेचा डोईवर डुचमळला
अन् भिजली तनू देखणी
आली चंद्रावळ मी नखर्याची
लाल पैठण जरीच्या पदराची
जशी रंभा अप्सरा इंद्राची
उभी धरणीच्या अंगणी
नको कान्हा अशी ही बळजोरी
मथुरेच्या जाऊ दे बाजारी
दिस बुडताना येईन माघारी
तुज पुरवीन मी मागणी
ठुमकत आल्या किती गौळणी
आले नेसून काळी चंद्रकळा
सोळा शिणगार आले घालून गळा
घडा लाजेचा डोईवर डुचमळला
अन् भिजली तनू देखणी
आली चंद्रावळ मी नखर्याची
लाल पैठण जरीच्या पदराची
जशी रंभा अप्सरा इंद्राची
उभी धरणीच्या अंगणी
नको कान्हा अशी ही बळजोरी
मथुरेच्या जाऊ दे बाजारी
दिस बुडताना येईन माघारी
तुज पुरवीन मी मागणी
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | मंत्र्यांची सून |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर, लावणी |
चंद्रकळा | - | फक्त काळ्या रंगाची साडी. |
रमणी | - | सुंदर स्त्री / पत्नी. |