तू दर्याचा राजा नाखवा
          तू दर्याचा राजा नाखवा रे नाखवा
दर्याच्या लाटांवर
डुले ग माझं घर
कसं चंदेरी लाटांवर
भरे मनात का हुरहूर
तू जिवाचा माझ्या नाखवा रे नाखवा
राया जाऊ नको रे दूर
जणू भवती पडे अंधेर
नाचत मुरकत डौलात
आली बघ आकाशी चंद्राची कोर
तू दिलाचा माझ्या नाखवा रे नाखवा
जवा दर्याची रुपेरी मासळी
तुझ्या डोळ्यांत मजला भासली
तुझी पिरती मनामधी हसली
चल माघारी ये रे नाखवा रे नाखवा
          दर्याच्या लाटांवर
डुले ग माझं घर
कसं चंदेरी लाटांवर
भरे मनात का हुरहूर
तू जिवाचा माझ्या नाखवा रे नाखवा
राया जाऊ नको रे दूर
जणू भवती पडे अंधेर
नाचत मुरकत डौलात
आली बघ आकाशी चंद्राची कोर
तू दिलाचा माझ्या नाखवा रे नाखवा
जवा दर्याची रुपेरी मासळी
तुझ्या डोळ्यांत मजला भासली
तुझी पिरती मनामधी हसली
चल माघारी ये रे नाखवा रे नाखवा
| गीत | - | दत्ता डावजेकर | 
| संगीत | - | दत्ता डावजेकर | 
| स्वर | - | लता राव | 
| गीत प्रकार | - | कोळीगीत (दर्यागीत) | 
| नाखवा | - | जहाजावरचा मुख्य नावाडी, तांडेल. | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
 
   
   
   
   
   
   
   
   
   
  











 दाद द्या अन् शुद्ध व्हा !
 दाद द्या अन् शुद्ध व्हा !