तू नजरेने 'हो' म्हटले
तू नजरेने 'हो' म्हटले मग वाचेने वदणार कधी?
कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी?
तुझे हासरे हृदय आठवित दुःखाची विसरते घडी
त्या हृदयाचा या हृदयाशी संगम रे होणार कधी?
तू नसताना तुझी आठवण मना जाळिते पदोपदी
एक विचारू तुला?
काय?
होणार कधी ग सप्तपदी?
कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी?
तुझे हासरे हृदय आठवित दुःखाची विसरते घडी
त्या हृदयाचा या हृदयाशी संगम रे होणार कधी?
तू नसताना तुझी आठवण मना जाळिते पदोपदी
एक विचारू तुला?
काय?
होणार कधी ग सप्तपदी?
गीत | - | यशवंत देव |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | आशा भोसले, सुधीर फडके |
चित्रपट | - | झाले गेले विसरून जा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत, नयनांच्या कोंदणी |
Print option will come back soon