तू थांब दूर तेथे
तू थांब दूर तेथे, येऊ नकोस जवळी
जुळती न जोवरी या गीतामधील ओळी
रेषेपलीकडे त्या तू एक स्वप्न माझे
मी धुंद लोचनांनी पाही युगे युगे जे
टाकी पुसून जादू तव हाक ही अवेळी
येई सुगंध कुठुनी मजला नको कळाया
गतजन्मीच्या कहाण्या वार्यास या पुसाव्या
होईल कागदाचे हे फूल ना सकाळी
जुळती न जोवरी या गीतामधील ओळी
रेषेपलीकडे त्या तू एक स्वप्न माझे
मी धुंद लोचनांनी पाही युगे युगे जे
टाकी पुसून जादू तव हाक ही अवेळी
येई सुगंध कुठुनी मजला नको कळाया
गतजन्मीच्या कहाण्या वार्यास या पुसाव्या
होईल कागदाचे हे फूल ना सकाळी
गीत | - | वसंत निनावे |
संगीत | - | भानुकांत लुकतुके |
स्वर | - | श्यामा चित्तार |
गीत प्रकार | - | भावगीत |