तू तिथे अन् मी इथे हा
तू तिथे अन् मी इथे हा व्यर्थ झुरतो अंतरी
खवळला दुर्दैवसिंधू पसरला मध्यंतरी
मीलनाची या जिवाची भंगली आशा तरी
प्रीत आंधळी दिव्यगुणा, दावी मार्ग प्रेमी सुजना
भाव भोळा हा साजणा बंधना जुमानित ना
निशा दाटे जीवा लावित घोर, घनघोर
बघ उगवे चंद्रकोर
नाचवी जीव-चकोर
गुंफिते एकत्र सुमना प्रीतबाला साजरी
जीव दोन्ही एक सखये, दूर देहाने जरी
खवळला दुर्दैवसिंधू पसरला मध्यंतरी
मीलनाची या जिवाची भंगली आशा तरी
प्रीत आंधळी दिव्यगुणा, दावी मार्ग प्रेमी सुजना
भाव भोळा हा साजणा बंधना जुमानित ना
निशा दाटे जीवा लावित घोर, घनघोर
बघ उगवे चंद्रकोर
नाचवी जीव-चकोर
गुंफिते एकत्र सुमना प्रीतबाला साजरी
जीव दोन्ही एक सखये, दूर देहाने जरी
गीत | - | स. अ. शुक्ल |
संगीत | - | जी. एन्. जोशी |
स्वर | - | गंगुबाई हनगल, जी. एन्. जोशी |
गीत प्रकार | - | भावगीत, युगुलगीत |
चकोर | - | चांदणे हेच ज्याचे जीवन असा एक पक्षी. |
सुमन | - | फूल. |