तुज वेड लावुनी अपुल्या
तुज वेड लावुनी अपुल्या वेणूनादे
डोहात बुडाला श्याम अचानक राधे !
जाशील कुणास्तव सजुनी संध्याकाळी?
बघशील कुणाची वाट कदंबाखाली?
हसवील कोण तव लटका राग विनोदे?
इतक्यात मनोहर खेळत होता येथे
तव नयन तयाच्या तेजा प्राशित होते
हे सत्य म्हणू की क्रूर स्वप्न एखादे?
बुडविला कृष्ण का निर्दय यमुनामाई
ठेविली कशाला जिवंत छाया मग ही?
पोटात तुझ्या मज ठाव दयेने दे दे !
डोहात बुडाला श्याम अचानक राधे !
जाशील कुणास्तव सजुनी संध्याकाळी?
बघशील कुणाची वाट कदंबाखाली?
हसवील कोण तव लटका राग विनोदे?
इतक्यात मनोहर खेळत होता येथे
तव नयन तयाच्या तेजा प्राशित होते
हे सत्य म्हणू की क्रूर स्वप्न एखादे?
बुडविला कृष्ण का निर्दय यमुनामाई
ठेविली कशाला जिवंत छाया मग ही?
पोटात तुझ्या मज ठाव दयेने दे दे !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | ललिता फडके |
चित्रपट | - | माझं घर माझी माणसं |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर |
कदंब (कळंब) | - | वृक्षाचे नाव. |
वेणु | - | बासरी. |