तुझी रे उलटी सारी
तुझी रे उलटी सारी तर्हा
सौंदर्याची दौलत टाकून जासी भलत्या घरा
राजमंदिरी असंख्य नारी
रूपवती त्या अतुल सुंदरी
तुडवुन त्यांची नाजुक सुमने जासी परदारा
शोभे का हे तुला माधवा
गालबोट हे तुझिया नावा
सोडून दे ती कुब्जा काळी सोडून दे श्रीधरा
हात जोडिते पदर पसरिते
तुजविण जीवन उदास गमते
तुझ्या पदाविण दिसे भुकेला सोन्याचा उंबरा
सौंदर्याची दौलत टाकून जासी भलत्या घरा
राजमंदिरी असंख्य नारी
रूपवती त्या अतुल सुंदरी
तुडवुन त्यांची नाजुक सुमने जासी परदारा
शोभे का हे तुला माधवा
गालबोट हे तुझिया नावा
सोडून दे ती कुब्जा काळी सोडून दे श्रीधरा
हात जोडिते पदर पसरिते
तुजविण जीवन उदास गमते
तुझ्या पदाविण दिसे भुकेला सोन्याचा उंबरा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
कुब्जा | - | कंसदासी, तीन ठिकाणी वक्र होती. हिला कृष्णाने सरळ केले. |
सुमन | - | फूल. |
Print option will come back soon