तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा
तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे
माझ्या डोळ्यांत मूर्ति तुझी विलसे
पदकमळे जी हरिची नाजुक
पैंजणेच मी त्यातिल मोहक
प्रभुची प्रीती मनि या आणिक
प्रेमळ भाव वसे
कृष्णमोहना मी तव माया
कमळमुखातिल वाणी मी राया
तुझीच सेवा सुखवी हृदया
अंतरि श्याम हसे
माझ्या डोळ्यांत मूर्ति तुझी विलसे
पदकमळे जी हरिची नाजुक
पैंजणेच मी त्यातिल मोहक
प्रभुची प्रीती मनि या आणिक
प्रेमळ भाव वसे
कृष्णमोहना मी तव माया
कमळमुखातिल वाणी मी राया
तुझीच सेवा सुखवी हृदया
अंतरि श्याम हसे
गीत | - | शांताबाई जोशी |
संगीत | - | गोविंद पोवळे |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत, नयनांच्या कोंदणी |