A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उघडी द्वार पूर्वदिशा

उघडी द्वार पूर्वदिशा नारायण आले,
उजाडले!

भूमिपाल चालला धरतीच्या पूजना
शिंपडी सडा सजवी सुवासिनी अंगणा
वसुंधरेचे हास्य झळकले,
उजाडले!

गंगेवर तेजाचा पाऊस झिमझिमता
पर्णावर मोत्यांचे दंवबिंदु लखलखता
गंधवतीने रंग उधळिले,
उजाडले!

पूजीत कुलदेवा महेशा
येई फुलवीत मनीची आशा
सुखवी घरदार घेऊनी त्या
जीव जिवाचा जगवीता

 

  आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर