A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उमलले आभाळभर हे

उमलले आभाळभर हे चांदणे माझे-तुझे
लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे-तुझे

दरवळाया लागली ही शांतता दोघांतली
केवढे गंधाळले ! गंधाळणे माझे-तुझ्रे

हे असे श्वासांतल्या श्वासात आपण बोललो
आणि वार्‍याला समजले बोलणे माझे-तुझे

उजळला एका क्षणीं दोघांतला काळोख हा
एकमेकांतून आता तेवणे माझे-तुझे
गीत - वैभव जोशी
संगीत - हृषिकेश-सौरभ-जसराज
स्वर- अनुराधा कुबेर
चित्रपट - मुरांबा
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.