उनाड पाऊस अशांत पाऊस
उनाड पाऊस, अशांत पाऊस, अधीर भिरभिणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस
हाक तृषेची येता कानी मातीची ऐकून विराणी
मेघांच्या कुंभातुन बरसे अमृतमय जलधारा पाऊस
प्राण नवे झाडांना देई, गीत नवे पक्षांना देई
बैरागी रानातुन फिरवी शांत-शीतल वारा पाऊस
पहाड-राने नदी-सरोवर ऊरा-उरी भेटून सार्यांना
एकाएकाला लावून जाई सृजनाचा भंडारा पाऊस

गीत | - | चंद्रशेखर सानेकर |
संगीत | - | अवधूत गुप्ते |
स्वर | - | अवधूत गुप्ते, वैशाली सामंत |
गीत प्रकार | - | ऋतू बरवा, भावगीत |
तृषा | - | तहान. |
सृजन | - | निर्मिती. |