वाडीवरल्या वाटा गेल्या
वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी
लिंगोबाचा देव कसा बैसला देव्हारी
डोंगर देव्हारी.. राती फिरते अंबारी
देवाजीच्या डोईवर मेघूटांची बारी
भक्ताचा नाग्या फिरे त्येच्या दरबारी
वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी.
लिंगोबाचा देव कसा बैसला देव्हारी
डोंगर देव्हारी.. राती फिरते अंबारी
देवाजीच्या डोईवर मेघूटांची बारी
भक्ताचा नाग्या फिरे त्येच्या दरबारी
वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी.
गीत | - | ना. धों. महानोर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | रवींद्र साठे, चंद्रकांत काळे |
चित्रपट | - | जैत रे जैत |
गीत प्रकार | - | चित्रगीत |