वारा फोफावला
वारा फोफावला दर्या उफाळला
माझं ग तारू कसं हाकारू सजणे समिंदरांत?
लाटेवर लाट पाठोपाठ
थयथय दरिया, नाचे काठोकांठ
तुफानाची खुणगांठ
वार्यानं शीड करी फडाफडा
छातीत होई धडाधडा
माझी काय छाती नाय् वल्हवायला
हे बघ कललं उजवीकडं
क्षणांत झुकलं डावीकडं
फेसाळ पाणी होडीत आलं थोडंथोडं
माझं ग तारू कसं हाकारू सजणे समिंदरांत?
लाटेवर लाट पाठोपाठ
थयथय दरिया, नाचे काठोकांठ
तुफानाची खुणगांठ
वार्यानं शीड करी फडाफडा
छातीत होई धडाधडा
माझी काय छाती नाय् वल्हवायला
हे बघ कललं उजवीकडं
क्षणांत झुकलं डावीकडं
फेसाळ पाणी होडीत आलं थोडंथोडं
गीत | - | बाबुराव गोखले |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गजानन वाटवे |
राग | - | शिवरंजनी |
गीत प्रकार | - | कोळीगीत |
तारु | - | नौका. |