वार्यानें हलतें रांन
वार्यानें हलतें रांन
तुझें सुनसान
हृदय गहिवरलें;
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईंतले..
डोळ्यांत शीण
हातात वीण
देहांत फुलांच्या वेगीं
अंधार चुकावा म्हणुन
निघे बैरागी..
वाळूंत पाय
सजतेस काय?
लाटान्ध समुद्राकांठीं
चरणांत हरवला गंध
तुझ्या कीं ओठीं?
शून्यात गर्गरे झाड
तशी ओढाळ
दिव्यांची नगरी;
वक्षांत तिथीचा चांद
तुझा कीं वैरी?
तुझें सुनसान
हृदय गहिवरलें;
गायीचे डोळे करुण उभे की
सांज निळाईंतले..
डोळ्यांत शीण
हातात वीण
देहांत फुलांच्या वेगीं
अंधार चुकावा म्हणुन
निघे बैरागी..
वाळूंत पाय
सजतेस काय?
लाटान्ध समुद्राकांठीं
चरणांत हरवला गंध
तुझ्या कीं ओठीं?
शून्यात गर्गरे झाड
तशी ओढाळ
दिव्यांची नगरी;
वक्षांत तिथीचा चांद
तुझा कीं वैरी?
गीत | - | ग्रेस |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
चित्रपट | - | निवडूंग |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
ओढाळ | - | चंचल, स्वैर. |