विठ्ठल सोयरा सज्जन
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा ।
जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥
सींण भाग त्यासी सांगेन आपुला ।
तो माझा बापुला सर्वे जाणें ॥२॥
माय माउलिया बंधुवर्गा जाणा ।
भाकीन करुणा सकळिकांसी ॥३॥
संत महंत सिद्ध महानुभाव मुनि ।
जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥४॥
माझिये माहेरीं सुखा काय उणें ।
न लगे येणें जाणें तुका ह्मणे ॥५॥
जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥
सींण भाग त्यासी सांगेन आपुला ।
तो माझा बापुला सर्वे जाणें ॥२॥
माय माउलिया बंधुवर्गा जाणा ।
भाकीन करुणा सकळिकांसी ॥३॥
संत महंत सिद्ध महानुभाव मुनि ।
जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥४॥
माझिये माहेरीं सुखा काय उणें ।
न लगे येणें जाणें तुका ह्मणे ॥५॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | शांक-नील |
स्वर | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
गीत प्रकार | - | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल |