A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी

विठ्ठल विठ्ठल गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥

होतो नामाचा गजर ।
दिंड्या पताकांचा भार ॥२॥

निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥

हरि कीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥
रचना-संत चोखामेळा
संगीत -
स्वर - गंगाधर लोंढे
गीत प्रकार - संतवाणी विठ्ठल विठ्ठल
वैष्णव - विष्णुभक्त.