A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विठ्ठला समचरण तुझे

विठ्ठला, समचरण तुझे धरिते
रूप सावळे दिव्य आगळे, अंतर्यामी भरते

नेत्रकमल तव नित्‌ फुललेले
प्रेममरंदे किती भरलेले
तव गुण-गुंजी घालीत रुंजी
मानस-भ्रमरी फिरते

अरुण-चंद्र हे जिथे उगवती
प्रसन्‍न तव त्या अधरावरती
होऊन राधा माझी प्रीती
अमृतमंथन करिते

जनी लाडकी नामयाची
गुंफुन माला प्राणफुलांची
अर्पुन कंठी मुक्तीसाठी
अविरत दासी झुरते
अंतर्यामी - अंत:करण / मन.
अधर - ओठ.
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
अविरत - अखंड.
आगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.
गुंजन - गुणगुण.
मरंद (मकरंद) - फुलातील मध.
मानस - मन / चित्त / मानस सरोवर.
रुंजी - गुणगुणत घातलेली चक्कर.
समचरण - पाय.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.