A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
​वृंदावनी कुणी बाई

​वृंदावनी कुणी बाई तुळस लाविली
वारियाच्या झुळुकीनं हळुच डोलली !

तुळशीतळी वास करी
गोकुळीचा कृष्ण हरी
गोविंदाच्या प्रीतीची ही डुलत साउली !

उन्हं कोवळी सोनेरी
तुळशीच्या रोपावरी
माझ्या मनी कुणी आलं चोरपाउली !

तुळशीचं रोप डुलं
सोनियानं बाई न्हालं
शेवंतीची कांती माझ्या शरिरी हासली !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- माणिक वर्मा
चित्रपट - जिवाचा सखा
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.