A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या मातीचे मोल आम्हाला

या मातीचे मोल आम्हाला कळले आहे
दिव्य यशाप्रत पाऊल आमुचे वळले आहे

या भूमीच्या पुण्याईवर जगलो आम्ही सारे
इथेच आपण मानव्याला मुकलो ऐसे का रे?
अंधपणातील द्वैत आम्हांतील गळुनी गेले आहे
ऐक्याची उद्याने आज फुलली रे

रक्ताहुनही निज घामाला असते किम्मत मोठी
सदैव आहे निष्ठेमधली हिम्मत अपुल्या पाठी
गद्दारांचे स्वप्‍न अमंगल जळुनी गेले आहे
मंगलतेची जाळी आज फुलली रे

बेघर आता कधी न राहील अपुला बांधव कोणी
समतेच्या कंठात शोभती मंगलतेची लेणी
पवित्र माती अपुले नाते जुळुनी आले आहे
अंधाराची गाठ आज सुटली रे