A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या पाण्याची ओढ भयानक

या पाण्याची ओढ भयानक
नेई अचानक डोहाखाली
चुकू लागले नाडी ठोके, अंगांगावर गुंगी आली

तुला मला ते कळले पुरते
डोहाजवळी आल्यानंतर
दो हातांवर दोघे असुनी अलंघ्य झाले तेही अंतर

उभय तीर तर हुकले आता
वाट उरे आवर्तामधली
कशास आता दुबळा झगडा अर्धीमुर्धी घटका उरली

पृथ्वीवरचे पुण्य हरपले
स्वर्गाकडची चुकलो परवल
का नाही गे, का नाही मग भोगायाचे अतल रसातल
गीत- वसंत बापट
संगीत - वसंत आजगांवकर
स्वर - वसंत आजगांवकर
गीत प्रकार - भावगीत
परवल - खूण, संकेत, परवलीचा शब्द.
लंघणे (उल्लंघणे) - ओलांडणे, पार करणे.

 

Random song suggestion
This 👇 player works on all android and iOS devices also
  वसंत आजगांवकर