A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आधार जिवाला वाटावा

वय तर माझे सोळा सत्रा
स्वभाव अगदी भोळा-भित्रा

आधार जिवाला वाटावा
असा कुणी मज भेटावा !

जो येतो तो भवती फिरतो
सौंदर्याचे कौतुक करतो
हा त्रास जयाने निपटावा
असा कुणी मज भेटावा !

कुणी म्हणे मज गुलाब हसरा
कुणी म्हणे मज गुणी शर्करा
अभिमान ज्यापुढे फिकटावा
असा कुणी मज भेटावा !

ब्रह्मचारी मज देतो टॉफी
गृहस्थ पाजितो काळी कॉफी
पण संसार जयासी थाटवा
असा कुणी मज भेटावा !

एकोणिस वा वीस वयाचा
मलाच राहील वचक जयाचा
मन-पतंग त्याने काटावा
असा कुणी मज भेटावा !
पृथक्‌
या गाण्याचे शब्द 'Sound Of Music' या आंग्ल चित्रपटातील 'I am sixteen going on seventeen' या गाण्याच्या शब्दांशी साधर्म्य सांगतात.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.