A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आगीनफुलं ही तोडा बायांनो

भर उन्हात जळते धरती, तिच्या काळजाला चटकं बसती
त्या ठिणग्या मातीतून फुलती, त्यांचा माणसाकडं ओढा

आगीनफुलं ही तोडा बायांनो, आगीनफुलं ही तोडा
लाल लाल मिरची तोडा बायांनो, लवंगी मिरची तोडा

ही किमया ग मायाळू धरतीची
ही जादूगिरी मातीच्या पिरतीची
दर वर्षाला बाग-फुलं नवतीची
तिखट मिरची हिकडं पिकली,
तिकडं उसाचा पेढा

आली वयात ग, तांबूस पिवळी झाली
कशी किरणानं उन्हात चमके लाली
वर पांघरल्या पानांच्या हिरव्या शाली
हलक्या हाती पिकली वेचा,
कवळी कवळी तोडा
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर- जयवंत कुलकर्णी, बकुळ पंडित, केशर सोलापूरकर, कांचन
चित्रपट - कुंकू माझं भाग्याचं
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  जयवंत कुलकर्णी, बकुळ पंडित, केशर सोलापूरकर, कांचन