A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आई कुणा म्हणू मी

आई कुणा म्हणू मी, तुजवीण सांग आई?
इतुकेच सांगण्याला येशील का ग आई?

तोडीत ना फुलाला वेली स्वये कधीही
सोडून तू मुलाला गेलीस का ग आई?

रागावण्या तुलाही मजवीण बाळ नाही
बाळाविना तुलाही कोणी म्हणेल आई?

चुकतो असेन मी गे, म्हणतो तुला मी आई
चुकलीस तू परि का, होऊन माझी आई?
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभु
स्वर- आशा भोसले
चित्रपट - पुत्र व्हावा ऐसा
गीत प्रकार - आई, चित्रगीत
स्वये - स्वत:

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.