A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उभवू उंच निशाण

उभवू उंच निशाण !
नव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण !

दीन दीन जे, दलित दलित जे
त्या सर्वांना ध्वज हा देईल सदैव छाया छान
उभवू उंच निशाण !

अंध अमानुष रूढी घालिती अखंड जगी थैमान
त्या क्रुरांना हे क्रांतीचे मूर्तिमंत आव्हान
ताठ ठेविती मान झुंजुनी भीमदेव धीमान्‌
शूर शिपाई आम्ही त्यांचे व्यर्थ न ते बलिदान

ध्वज मिरवीत हा गौतम गेले टाकुनी राज्य महान
पुसुनी आसवे मानवतेची होती बुद्ध महान
हे समतेचे हे ममतेचे, गांधीजीचे गान
हरिजन धरुनी उरी स्वीकरी जे फकिरीचे वाण
धीमान्‌ (धी) - बुद्धीमान.