A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आई माझी कोणाला पावली

आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली
पावली कोली लोकायाला गो कोली लोकायाला
आई माझी एकोरी एकोरी गो आई माझी एकोरी एकोरी
आई तुझी लोनावल्याची वाट गो आई तुझी लोनावल्याची वाट
आई तुझं मलवली ठेसन गो आई तुझं मलवली ठेसन
आई तुझा गुल्लालु डोंगर गो आई तुझा गुल्लालु डोंगर
आई तुझा डोंगर कुणी बांधिला गो आई तुझा डोंगर कुणी बांधिला
बांधिला पाच पांडवांनी गो भीमा बांधवांनी
आई तुझं देऊळ कुणी बांधिलं गो आई तुझं देऊळ कुणी बांधिलं
बांधिलं पाच पांडवांनी गो अर्जुन बांधवांनी
आई माझी कोंबर्‍यावर बैसली गो आई माझी कोंबर्‍यावर बैसली
आई तुला नवस काय काय बोलु गो आई तुला नवस काय काय बोलु
आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली
पावली कोली लोकायाला गो कोली लोकायाला
गीत -
संगीत -
स्वर- शाहीर साबळे
गीत प्रकार - कोळीगीत, या देवी सर्वभूतेषु

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.