A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज अंतर्यामी भेटे कान्हो

आज अंतर्यामी भेटे
कान्हो वनमाळी
अमृताचा चंद्रमा भाळी
उगवला हो

फुलांचे केसरा
घडे चांदण्याचा संग
आज अवघे अंतरंग
ओसंडले हो

मिटूनही डोळे
दिसू लागले आकाश
आज सारा अवकाश
देऊळ झाला हो

काही न बोलता
आता सांगता ये सारे
आतली प्रकाशाची दारे
उघडली हो