A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज इथं तर उद्या तिथं

रानपांखरा, दोन दिसांची दुनियेची दौलत
आज इथं तर उद्या तिथं !

जेथे चारा तेथे थारा
जिथे देणगी तिथे नगारा
जाऊ तेथे निशाण रोवू ते अपुले दैवत !

मिळता खाणे गाता गाणे
जगायचे तर सुखात जगणे
गावाहून ही बरी आपणा वार्‍याची संगत !

वारा नेईल तिकडे जाऊ
एकसुराने गाणी गाऊ
मिळेल तुकडा पुरे तेवढा, त्यात खरी रंगत !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- आशा भोसले
चित्रपट - जशास तसें
गीत प्रकार - चित्रगीत
रंगत - मौज.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.