माझे जगणे होते गाणे
जाता जाता गाइन मी
गाता गाता जाइन मी
गेल्यावरही या गगनातिल
गीतांमधुनी राहिन मी.
माझे जगणे होते गाणे..
कधी मनाचे कधी जनाचे
कधी धनास्तव कधी बनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नादतराणे..
आलापीची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे..
राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रंदन
अजाणतेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे..
जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरली काही
अदृश्यातिल आदेशांचे
ओझे फक्त वहाणे..
गाता गाता जाइन मी
गेल्यावरही या गगनातिल
गीतांमधुनी राहिन मी.
माझे जगणे होते गाणे..
कधी मनाचे कधी जनाचे
कधी धनास्तव कधी बनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नादतराणे..
आलापीची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे..
राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रंदन
अजाणतेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे..
जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरली काही
अदृश्यातिल आदेशांचे
ओझे फक्त वहाणे..
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | सलील कुलकर्णी |
स्वर | - | सलील कुलकर्णी |
अल्बम | - | संधीप्रकाशात |
गीत प्रकार | - | भावगीत |
अदृष्ट(ष्य) | - | न पाहिलेले / दैव, प्रारब्ध. |
कूजन | - | आवाज. |
क्रंदन | - | आकांत. |
राई | - | अरण्य, झाडी / मोहरी. |
राजस | - | सुंदर / रजोगुणी. |